सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संदेश पोचविण्यासाठी काल पुण्यात ‘बस डे ‘ राबविण्यात आला. या निमित्ताने पुणेकरांनी आपली खाजगी वाहने सोडून बस ने प्रवास करायचा प्रयत्न केला, परंतु या उपक्रमाला नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. शहरातील काही भागात वाहतूक सुरळीत चालू होती परंतु काही ठिकाणी अतिरिक्त बसेस मुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. डेक्कन स्थानका वरून केवळ वारजे- माळवाडी, हडप
सर आणि कोथरूड डेपो कडे जाण्यासाठीच्याच बसेस सतत धावताना दिसत होत्या. अप्पर, धायरी आणि हिंजेवाडी या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना बस साठी ताटकळत थांबावे लागले. शेवटी काही लोकांनी रिक्षा चा मार्ग अवलंबला. या उलट काही जेष्ठ नागरिकांनी उत्साहाने बस ने प्रवास केला. खूप दिवसांनी बस ने प्रवास करणाऱ्या लोकांना तिकीटदर खूप वाढलेले जाणवले.
