कोथरूड, पौड रोड हा पुण्यातील एक अतिशय रहदारीचा रस्ता आहे. असे असूनही ह्या रस्त्यावर फक्त दोनच चौकात सिग्नल आहेत. रहदारीच्या वेळी ह्या रस्त्यावर बेशिस्तपणाचे  उत्तम दर्शन घडते.  ह्या रस्त्यावरच्या ओगले चौकात पाच मिनिटाच्या कालावधीत  कमीत कमी चार गाड्या  वन वे तून चुकीच्या दिशेने मोरेविद्यालय च्या रस्त्यावर  शिरताताना दिसून येतात. तसेच ह्याच चौकातील  बसथांबा  अतिशय चुकीच्या रीतीने बांधला गेला आहे. हा बसथांबा बरोबर पदपथाच्या मध्यात बांधण्यात आला असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. हा बसथांबा मुख्य रस्त्यापासून खूप लांब असल्याने प्रवाश्यांना सायकल मार्ग आणि मुख्य रस्त्यावर बस पकडण्यासाठी थांबावे लागते. परिणामी सायकलस्वार आणि पादचारींना अडथळा निर्माण होतो आणि ते पण मुख्य रस्त्यावरून ये -जा करतात. येथील सायकल मार्गावरील फलक दुरावस्थेत  असून तिथेच पडले आहे. एकूणच ह्या चौकात वाहतुकीचे सर्वच नियम धाब्यावर बसवले आहेत. ह्या सर्व कारणांमुळे वाहतुकीस धोका  निर्माण झाला आहे.