पुणे शहरातील पाणीपुरवठा उद्या बंद

शहरातील जलकेंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे होणार असल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. 13) पूर्ण दिवस बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. तसेच शुक्रवारी (ता. 14) उशिरा आणि कमी दाबाने पुरवठा होण्याची शक्‍यता आहे.

पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, नवी होळकर जलकेंद्रात स्थापत्य आणि विद्युतविषयक देखभाल दुरुस्तीची कामे होणार आहेत. पर्वती जलकेंद्रांतर्गत शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर, पर्वती गाव, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर, सातारा रस्ता, बिबवेवाडी परिसर, पद्मावती, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, विधी महाविद्यालय रस्ता, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वरनगर, साईबाबानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, पर्वती व पद्मावती टॅंकर भरणा केंद्र ः वडगाव जलकेंद्रांतर्गत हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज व भारती विद्यापीठ परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
चतुःशृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्रांतर्गत पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी- उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे महामार्ग परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
लष्कर जलकेंद्रांर्तगत लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी तसेच नव्या होळकर जलकेंद्रातंर्गत विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी परिसरातील पाणी पुरवठाही बंद राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
स्त्रोत : सकाळ
Advertisements