हजारोंच्या गर्दीसाठी फक्त ३ स्वच्छतागृहे!

नागरिकांना स्वच्छतागृहात जाण्याची वेळ आलीच, तर त्यांनी काय करावे याचे उत्तर मात्र यंत्रणांकडे नाही.

कसबा पेठेपासून मंडईपर्यंतच्या परिसरातील वास्तव

मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी तसेच गणपतींची आरास पाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा ओघ आता वाढला असून कसबा पेठेपासून मंडईपर्यंतच्या भागात दिवसभर प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. या परिसरात सहकुटुंब येणाऱ्या नागरिकांना स्वच्छतागृहात जाण्याची वेळ आलीच, तर त्यांनी काय करावे याचे उत्तर मात्र यंत्रणांकडे नाही. कसबा पेठेपासून मंडईपर्यंतच्या लोकप्रिय गणपती मंडळांच्या परिसरात ‘लोकसत्ता’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत या संपूर्ण पट्टय़ात केवळ तीन स्वच्छतागृहे असल्याचे समोर आले.

कसबा गणपती परिसर

मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपतीला भाविकांची मोठी गर्दी असते. त्या शेजारीच असलेला नवग्रह मित्र मंडळाचा जगन्नाथ पुरी रथही गर्दी खेचतो आहे. या भागात केवळ शनिवारवाडय़ासमोरील कसबा पेठ पोलीस चौकीशेजारी एक स्वच्छतागृह असून तिथे नेहमीच गर्दी असते. तिथपासून पुढे लाल महालापर्यंत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस वस्तू आणि खाद्यपदार्थाचे विक्रेते बसत असल्यामुळे हा रस्ता गजबजलेला असतो. आणखी पुढे वसंत टॉकिजवरून फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंतही स्वच्छतागृहाचा पत्ता नाही. या पोलीस ठाण्याच्या मागे तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या गल्लीत देखील कुठेही स्वच्छतागृह दिसून आले नाही.

दगडूशेठ गणपती

फरासखाना पोलीस चौकीला लागून दगडूशेठ गणपती मंदिर आहे. दगडूशेठ गणपती मंडळाचा देखावा हे आकर्षण असल्यामुळे इथपासून पुढे गर्दी उच्चांक गाठते. दगडूशेठ गणपती मंदिराला लागून जिथे चपला ठेवण्याची सोय करण्यात आली आहे त्याला लागूनच एक स्वच्छतागृह आहे. यातही पुरुषांचे स्वच्छतागृह दिसून येते, परंतु महिलांचे मोरीवजा स्वच्छतागृह मंडपाच्या पडद्याआड लपल्यामुळे चटकन कळतदेखील नाही, तरीही या ठिकाणी जाण्यासाठी महिलांची सतत रांग लागलेली असते. दगडूशेठ गणपती मंडळाच्या देखाव्याच्या ठिकाणापासून बाबू गेनू मंडळाच्या मागच्या बाजूपर्यंत सर्वाधिक गर्दी असूनही स्वच्छतागृह मात्र नाही.

मंडई गणपती

बाबू गेनू मंडळाच्या मागच्या बाजूकडून मंडई परिसरात शिरल्यावर समोरच्या बाजूला एक सुलभ शौचालय आहे. हा परिसरही प्रचंड गर्दीचा असल्यामुळे तिथेही रांगच असते. मंडईचा गणपती बसतो त्या संपूर्ण परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृह कुठेही नाही. मंडईच्या मागे बुरूड आळीच्या शेजारी एक विनामूल्य शौचालय आहे, परंतु त्यातील पुरुषांच्या स्वच्छतागृहास कुलूप लागले असून महिलांचे स्वच्छतागृह कुणीही जाऊ शकणार नाही अशा घाणेरडय़ा अवस्थेत आहे. तिथून पुन्हा रस्त्याला लागून भांडे आळीपर्यंत कुठेही स्वच्छतागृह नाही.

महिला पोलिसांची गैरसोय

या संपूर्ण पट्टय़ात गर्दीमुळे पोलीस बंदोबस्तही मोठा आहे. या बंदोबस्तातील महिला पोलिसांशी संवाद साधला असता स्वच्छतागृहांच्या अभावामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे समोर आले. मजूर अड्डा येथील दोन महिला पोलिसांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले, की त्या जवळपासच्या परिसरात कुठेही बंदोबस्ताला असल्या, तरी त्यांना स्वच्छतागृहासाठी फरासखान्यालाच परतावे लागते. बंदोबस्ताच्या काळात बाहेरच्या खाण्यामुळे त्रास होण्याची शक्यता अधिक असून अशा वेळी लांबच्या स्वच्छतागृहात जाणे शक्य होतेच असे नाही. अशा वेळी आसपासच्या नागरिकांना विनंती करून स्वच्छतागृह शोधण्याची वेळ त्यांच्यावर येते आहे. बेलबाग चौकातील महिला पोलिसांनीही स्वच्छतागृहाची वानवा असल्याचे बोलून दाखवले, तर मंडई परिसरातील महिला पोलिसांना स्वच्छतागृहासाठी फडगेट पोलीस चौकीत जावे लागते.  मागच्या बाजूपर्यंत सर्वाधिक गर्दी असूनही स्वच्छतागृह मात्र नाही.

मंडई गणपती

बाबू गेनू मंडळाच्या मागच्या बाजूकडून मंडई परिसरात शिरल्यावर समोरच्या बाजूला एक सुलभ शौचालय आहे. हा परिसरही प्रचंड गर्दीचा असल्यामुळे तिथेही रांगच असते. मंडईचा गणपती बसतो त्या संपूर्ण परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृह कुठेही नाही. मंडईच्या मागे बुरूड आळीच्या शेजारी एक विनामूल्य शौचालय आहे, परंतु त्यातील पुरुषांच्या स्वच्छतागृहास कुलूप लागले असून महिलांचे स्वच्छतागृह कुणीही जाऊ शकणार नाही अशा घाणेरडय़ा अवस्थेत आहे. तिथून पुन्हा रस्त्याला लागून भांडे आळीपर्यंत कुठेही स्वच्छतागृह नाही.

महिला पोलिसांची गैरसोय

या संपूर्ण पट्टय़ात गर्दीमुळे पोलीस बंदोबस्तही मोठा आहे. या बंदोबस्तातील महिला पोलिसांशी संवाद साधला असता स्वच्छतागृहांच्या अभावामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे समोर आले. मजूर अड्डा येथील दोन महिला पोलिसांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले, की त्या जवळपासच्या परिसरात कुठेही बंदोबस्ताला असल्या, तरी त्यांना स्वच्छतागृहासाठी फरासखान्यालाच परतावे लागते. बंदोबस्ताच्या काळात बाहेरच्या खाण्यामुळे त्रास होण्याची शक्यता अधिक असून अशा वेळी लांबच्या स्वच्छतागृहात जाणे शक्य होतेच असे नाही. अशा वेळी आसपासच्या नागरिकांना विनंती करून स्वच्छतागृह शोधण्याची वेळ त्यांच्यावर येते आहे.

बेलबाग चौकातील महिला पोलिसांनीही स्वच्छतागृहाची वानवा असल्याचे बोलून दाखवले, तर मंडई परिसरातील महिला पोलिसांना स्वच्छतागृहासाठी फडगेट पोलीस चौकीत जावे लागते.

काय दिसले?

* कसबा परिसरात कसबा पोलिस चौकीशेजारी एकमेव स्वच्छतागृह. तेथे मोठी रांग.

* दगडूशेठ मंदिराच्या शेजारी स्त्रियांसाठी एक मोरीवजा स्वच्छतागृह, परंतु ते चटकन न दिसणारे.

*  दगडूशेठ व मंडई देखाव्यांच्या परिसरात एकच सुलभ शौचालय, शिवाय एक विनामूल्य शौचालय, परंतु ते अत्यंत घाणेरडय़ा अवस्थेत.

स्त्रोत : लोकसत्ता

pun04-2

Advertisements