“स्टेशन घाण करणा-यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम”

रेल्वे मंत्रालयाने स्टेशनच्या परिसरात घाण करणाऱ्यांकडून५०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश डिसेंबर महिन्यातकाढले आहेत . त्यानुसार रेल्वेने प्रत्येक स्टेशनवर घाणकरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे .स्टेशन परिसरात कचरा टाकणे , थुंकणे , आंघोळ करणे आदीप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे . रेल्वेच्यापुणे विभागातील सर्व स्थानकांवर ही मोहीम सातत्यानेराबवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे . नागरिकांमध्ये जागरुती आणण्यासाठी रेल्वेप्रशासनाने स्टेशन परिसरातील आरक्षण केंद्र , प्लॅटफॉर्म या ठिकाणी पोस्टर्स आणि स्टिकर्स लावण्यात आले आहेत

full_48150568.jpg (504×337).

Advertisements