प्रवाह पूर्ववत करा; अन्यथा फौजदारी

कात्रज येथील टेकडी आणि परिसरात राठोड यांची साठ एकर जागा आहे. टेकडीवर बेकायदा प्लॉट पाडण्यात आले आहेत. तिथे जाण्यासाठी डोंगर फोडून बेकायदा रस्ता तयार करण्यात आला आहे. या प्रकरणी यापूर्वीही जिल्हा प्रशासनाने राठोड याला नोटीस देऊन कारवाई केली होती. मात्र, त्यास न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे ही कारवाई थांबली होती; परंतु आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसात पाण्याचा लोंढा येऊन शिंदेवाडी येथे एक महिला आणि 14 महिन्यांची मुलगी मृत्युमुखी पडली. प्रशासनाने केलेल्या तपासणीमध्ये कात्रज येथील बेकायदा टेकडीफोडीच्या या घटनेस कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे.
या संदर्भात भोरचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले म्हणाले, “”राठोड याने डोंगर फोडून रस्ता तयार केल्यामुळे पाण्याचे नैसर्गिक ओहोळ बंद झाले. त्यामुळे फौजदारी दंडसंहितेतील कलमानुसार ही नोटीस बजाविण्यात आली आहे.” 

कात्रज येथील टेकडीफोडप्रकरणी राठोड याला 68 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच जमिनीचा लिलाव करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती; परंतु न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे ही कारवाई थांबली असल्याचेही आसवले यांनी सांगितले. दरम्यान, कात्रज येथील जुन्या बोगद्यापासून ते भोरच्या हद्दीपर्यंत महामार्गाच्या कडेने असलेली 70 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.

full_2Pc0040300.jpg (517×293)

Advertisements