“पडलेली झाडे गोळा करण्यास उद्यान विभागाला अपयश”

वादळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये अनेक छोटीमोठी झाडे, फांद्या पडल्या आहेत . त्यामुळे झाडाखालीलावलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. उद्यान विभागाचेकर्मचारी अत्यंत सावकाशपणे पडलेली झाडे उचलण्याचेकाम करीत असल्याने आठवडाभरानेही अनेक ठिकाणी हीझाडे रस्त्यावरच असले ली दिसून येत आहे .
बहुतांश सोसायट्यांनी स्वतःच्या सफाई कामगारांमार्फत झाडांच्या फांद्या गोळा करून रस्त्याच्या ठेवून दिल्याआहेत. काही भागात नागरिकांनी उद्यान विभागाकडे तक्रार नोंदवूनही घटनास्थळी देखील कर्मचारी फिरकलेलेनाहीत. अनेक सोसायट्यांमध्ये झाडे उचलण्यासाठी पैशांची मागणीही करण्य ात आली आहे. तुमच्या खासगीजागेतील झाडांमुळे रस्त्यावर कचरा झाला आहे . त्यामुळे तुम्ही पैसे दिलेत, तरच झाडे उचलणार अशीअरेरावीची भाषा उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ऐकू येत आहे.
उद्यान कर्मचाऱ्यांना पैसे देण्याची गरज नाह , असे सांगून याबाबत उद्यान विभागाचे अधिक्षक अशोक घोरपडे म्हणाले, ‘ वादळी पावसामुळे एका आठवड्यात ९२ तक्रारी आल्या असून, पुढील दोन दिवसात शहरातील झाडेगोळा करण्याचे काम पूर्ण होणार आहे . या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उद्यान विभागाने स्वतंत्र टीम तयारकेली आहे यामध्ये उद्यान विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि अग्निशामक दलाचा सहभागआह े.’ याशिवाय प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये आणि महापालिकेच्या वेबसाइटवर स्थानिक उद्यान अधिकाऱ्यांचेसंपर्क क्रमांकही आम्ही उपलब्ध केले आहेत , असे घोरपडे यांनी सांगितले.
अपुऱ्या यंत्रणेमुळे तक्रारींची दखल नाही
कोथरूड, कर्वेनगर, वारजे परिसरात लहानमोठी शंभरहून अधिक झाडे पडली. म ात्र , उद्यान विभागाकडे चारजेसीबी, सहा डंपर आणि आठ ट्रक एवढीच यंत्रणा उपलब्ध असल्याने नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली गेलेली नाही.

full_4908913416193069140_Mid.jpg (329×209)

Advertisements