पुण्यातील खड्डे आणि आपण

‘पुणेरी पाट्या’ जशा प्रचलित आहेत तसेच ‘पुण्यातील खड्डे’ हाही सध्या चर्चेचा विषय बनत आहेत. आधी खड्डा कि आधी रस्ता हा प्रश्न सध्या गहन होत चालला आहे. खड्ड्यातून रस्ता शोधावा तर ते वाहनचालकांना अशक्य होत चालले आहे आणि रस्त्यातून खड्डे काढावेत हे कदाचित महापालिकेला शक्य होत नाहीये. त्यामुळे पुण्यात वाहन चालवणे म्हणजे एखादे हत्यार चालविण्या एवढीच जोखीम पत्करावी लागते असे म्हणायला हरकत नाही. पुणे  महानगरपालिका  गेली  कित्येक  वर्ष चांगले रस्ते बनवण्यात सपशेल नापास होत आहे. पुण्यातुन प्रवास करताना हे खड्डे चुकवत  कसरत करतच जावे लागते. आणि अपघाताने जर एखाद्या खड्यात गाडी गेलीच तर तो  पाठीसाठी हाड-तोड अनुभव ठरतो.

मुळात हे खड्डे पडतातच कसे? चार – पाच सरींचे निमित्त साधून निकृष्ट रस्त्यांचे अंतरंग खड्ड्यांच्या रूपाने बाहेर पडू लागतात. रस्ता बनवताना वापरली जाणारी  सामग्रीच निकृष्ट दर्जाची असते. रस्ता बनवताना पाण्याचा निचरा होण्यासाठी त्याला उतार देण्याची गरज असते एवढेही लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे आधीच पाण्याने भरलेल्या रस्त्यात हे खड्डे दिसणेही महाकठीण होऊन जाते. यावर्षी जोराचा पाउस तर झालाच नाही, तरीही रस्ते मात्र खड्डेमय! आधी रस्ते तयार केले जाते जातात, मग पावसामुळे खड्डे पडतात, त्यांची दुरुस्ती होते न होते तोवर दूरध्वनी, पाणीपुरवठा,वीजवितरण, ड्रेनेज यांच्या कडून परत रस्त्याची खोडी सुरु होते आणि रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ !! बरं, या विभागांकडून काम पूर्ण झाल्यावर तरी रस्ता छान गुळगुळीत असावा तर तसेही नाही. कामासाठी खणलेले खड्डे बुजविल्यानंतर त्यांची पातळीही नीट  राखली जात नाही. ड्रेनेज व त्यासारख्या अन्य सुविधा या रस्त्याच्या समतल पातळीला असाव्या लागतात तसे नसेल तर तोही एक खड्डाच होतो.
खूपवेळा आपण पाहतो कि नवीन बनवलेला रस्ता ३ महिने सुद्धा टिकत नाही. आणि असे नवीन बनवलेले रस्ते खराब झाले तर पालिका आणि कंत्राटदार काहीच कृती करत नाहीत. DPL (Defect Liability Period) हा अशा कंत्राटदार साठी बनवलेला नियम आहे. ह्या नियमानुसार रस्त्याशी निगडीत पहिल्या ५ तक्रारी ह्या कंत्राटदारांनी फुकट दुरुस्त करायच्या असतात आणि तसे न केल्यास त्यांच्याशी झालेला करार मोडण्याचा पालिकेला हक्क असतो. परंतु हा नियम अस्तित्वात आहे ह्याची जाणीव कदाचित पुणे  महानगर पालिकेला नाही. हा नियम लागू झाल्यास पुण्यातील रस्ते कदाचित बनवतानाच निट लक्ष देऊन बनवले जातील.

या खड्ड्यांच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी पालिकेने २४ तास उपलब्ध असलेली ‘ Pothole helpline’सुरु केली, ज्यानुसार नागरिकांनी 020-25501083 ह्या Helpline number वर फोन केल्यास त्या  खड्डयाची  तक्रार २४ तासात निकाली लावण्यात येते. पण ही सोय उपलब्ध असतानाही आज रस्त्याच्या परिस्थितीत काहीच बदल झालेला दिसत  नाही. बऱ्याच  लोकांचा पालिकेच्या सेवेवर  विश्वास नसल्याने त्यांनी ह्या सुविधेचा उपयोग करूनच घेतला नाही.  पौड रोड, सातारा रोड, कर्वे रोड,सेनापती बापट रोड असे शहरातील मुख्य रस्ते अजून तसेच ओबडधोबड आणि खड्डेमय आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे वाहतुकीची कोंडी आणि अपघात.
आयुष्याच्या रस्त्यावर खांचखळगे असतात मान्य पण नेहमीच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरही अशीच कसरत करावी लागणे याहून दुर्दैवाची गोष्ट ती कोणती??…!!!!

full_542348_255631104558612_1695830931_n

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s