अन्न हे पूर्ण ब्रह्म !!

जेवणा आधी ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक आपण सगळ्यांनी लहानपणी म्हणलेला असेल. पानात काही टाकू नये अशी शिकवण सगळ्यांनाच दिली गेलेली असते. असे असूनही हल्ली किलोच्या किलोने वाया गेलेले अन्न हे दृष्य सर्रास पाहायला मिळते. शहरात रोज आपण अन्नाची नासाडी बघतो. कुठलेही मंगलकार्य, सभा किंवा खानावळ असो अन्न हमाखास वाया  जाताना दिसते. अशा ठिकाणी खास करून लग्न समारंभात, गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवले जाते आणि नंतर उरलेले अन्न अक्षरशः टाकून दिले जाते. एकीकडे बऱ्याच लोकांना एक   वेळच्या जेवणाची भ्रांत आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासधूस होताना दिसते. हे टाकून दिलेले अन्न मुळात खूप चांगल्या प्रतीचे असते ज्यात खूप लीकांचे पोट भरू शकते.  ह्या गहन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  किशोर सरपोतदार (पुणे गेस्ट हाऊसचे मालक ) ह्यांनी अन्नाचा पुनर्वापर करण्याचा वसा घेतला.

किशोर सरपोतदार हे पुणे कॅटेरर्स समितीचे अध्यक्ष आहेत. दररोजच होत असलेल्या अन्नाच्या नासाडीने खिन्न होऊन त्यांनी एका उपक्रमाला सुरवात केली. कार्य, सभा ,खानावळ असे कुठेही अन्न राहिले तर  अशा  वेळेस तेथील लोक किशोर सरपोतदार  ह्यांच्याशी संपर्क साधतात, मग सरपोतदार काही लोकांना तिथे पाठवून ते अन्न त्या त्या भागातील गरजू लोकांमध्ये वाटतात असे  ह्या उपक्रमाचे स्वरूप आहे. कधी जर योग्य वेळी संपर्क साधता आला नाही किंवा अन्न खराब झाले असेल तर ते हे सर्व अन्न खत निर्मितीसाठी पाठवतात. अशा तर्हेने  कुठल्याही प्रकारचे अन्न ह्या उपक्रमात वाया  जात नाही. हे कार्य सध्या मोफत चालविले जाते.
ह्या कार्यात आणखी गती आणि सुसूत्रता यावी  ह्यासाठी शहरातल्या प्रत्येक भागात अन्न गोळा  करण्याचे आणि वाटपाची केंद्र उभारावे अशी सरपोतदार ह्यांची  इच्छा आहे. जेणेकरून गरजू लोकांपार्यंत हे अन्न वेळेवर पोचावे.
नुसतेच जेवणाच्या सुरुवातीला ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ असे म्हणून या पूर्ण ब्रह्म अन्नाची उपेक्षा करण्यापेक्षा तेच अन्न भुकेल्या जीवाच्या पोटास नक्कीच शांती देऊ शकेल. तेव्हा अन्नाची अशी नासाडी होऊ नये हि आपल्या प्रेत्येकाचीच  जबाबदारी आहे. जर असे अन्न वाया जाताना तुमच्या नजरेस आले तर कृपया ९४२२०८०२२० ह्या नंबर वर त्वरित संपर्क साधा किंवा SMS करा आणि ह्या समाज कार्यात खारीचा वाटा उचला.
full_images (1)
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s