सावधान… ट्रान्सफॉर्मर उघडा आहे!

पुणे – शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था झाल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. उघड्या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल, दुरुस्तीकडे का लक्ष दिले जात नाही, अशा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यामुळे धोका वाढल्याने दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
शहर आणि उपनगरातील विविध रस्त्यांलगत ट्रान्सफॉर्मर आहेत; परंतु अनेक ठिकाणी ते उघडे आहेत. त्यातील वायरी लोंबकळत असतात. वर्दळीच्या पादचारी मार्गांवर हेच चित्र आहे. स्थानिक नागरिकांकडून पाठपुरावा करूनही दुरुस्ती केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. सिंहगड रस्ता, कर्वेनगर आणि वारजे माळवाडी परिसरातील रस्त्यांवर असलेले ट्रान्सफॉर्मर उघडे असल्याचे दिसून आले. शहरात इतरत्रही हीच परिस्थिती आहे. 
मुंढव्यात काही दिवसांपूर्वी उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे दोन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. सिंहगड रस्त्यावरील गोसावी वस्तीमध्येही अशीच घटना घडली, त्यामुळे पादचारी मार्ग आणि रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मर धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे सिंहगड रस्त्यावरील रहिवाशी आणि “सकाळ‘चे वाचक सतीश विजयकुमार यांनी म्हटले आहे. 
उपनगरातील रस्त्याकडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मच्या दुरुस्तीची कामे महावितरणने तातडीने सुरू केली पाहिजेत, अशी मागणी कात्रजमधील रहिवाशी नितीन निकम यांनी केली. 
किमान पावसाळ्यापूर्वी तरी ट्रान्सफॉर्मरची देखभाल आणि दुरुस्ती केली पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना असुरक्षितपणे चालावे लागते. अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. मात्र महावितरणसह अन्य यंत्रणांना त्याचे महत्त्व कळत नाही.
नितीन निकम, कात्रज 
शहरातील बहुतेक ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती केली आहे. लोकांच्या तक्रारी आल्यानंतर तातडीने दुरुस्ती केली जाते. याबाबत महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. 

जनसंपर्क विभाग, महावितरण

स्त्रोत : सकाळ
full_341541-mseb
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s