icare4pune

खडकवासला धरण भरले; पाणी सोडण्यास सुरवात

मंगळवारी रात्री दहा वाजल्यानंतर आज (बुधवार) सकाळी सहा वाजेपर्यंत धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, धऱणपातळीत मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण 99 टक्के भरले असून, मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे, धरणातून दुपारी 12 वाजता सुमारे 18,491 क्‍युसेकने पाणी सोडण्याचा निर्णय खडकवासला पाटबंधारे विभागाने घेतला आहे. सकाळी दहा वाजता पाच दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले होते. तर सकाळी अकरा वाजता 11 दरवाजे उघडून सुमारे 10 हजार क्‍युुसेकने सोडण्यात येणार आहे. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार व शाखा अभियंता आर. एस. क्षीरसागर यांनी दिली. पानशेत वरसगाव धरणावर 200 मिलिमिटर पर्यंत पाऊस पडल्याने भिंती खालील पडलेला पावसाचे पाणी खडकवासला धरणात जमा होत होते. त्यावेळी सुमारे पहाटे 15 हजाराच्या पुढे येवा खडकवासला धरणात जमा होत होता. रात्री दहा वाजता खडकवासला धरण 66 टक्के भरले होते. सकाळी सहा वाजता 86 टक्के भरले तर आठ वाजता 96 टक्के भरले. खडकवासला धरण 100 टक्के भरल्यावर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे ही शेलार यांनी सांगितले. पानशेत वरसगाव परिसराला झोडपले या धरणांच्या परिसरातील गावांना पावसाने रात्रभर झोडपून काढले. रात्री दहा वाजेपर्यंत दोन्ही धरणावर 60 मिमि पाऊस पडला. त्यानंतर, सकाळी सहा वाजेपर्यंत (आठ तासात) 140 मिमि पाऊस पडला. म्हणजे प्रत्येक तासाला किमान 17- 18 मिमि पाऊस पडत होता. काल दिवसभर नेहमी प्रमाणे होता. रात्री पाच ते सात वाजण्याच्या सुमारास पाऊस होता. रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पूर्ण पाऊस उघडला होता. रात्री दहानंतर या परिसरात पहाटे पर्यंत मुसळधार पावसाची संततधार सुरु होती. परिणामी शेतात काही तालींची फुटाफुट झाली आहे. अशी माहिती पानेशत जवळील रुळे गावचे रहिवाशी राजू हाळंदे यांनी “इसकाळ‘शी बोलताना दिली. धरणाचे नाव- 24 तासातील पाऊस/1 जून पासूनचा पाऊस/पाणीसाठा टीएमसी/पाणीसाठ्याची टक्केवारी टेमघर- 180/1770/2.00/54.05 पानशेत-201/1316/8.46/79.44 वरसगाव-205/1319/8.36/65.21 खडकवासला-72/487/1.72/86.99 कालव्यातून सोडलेले पाणी- 1155 चार ही धरणातील एकूण पाणीसाठी- 20.54 टीएमसी, 70.46 टक्केवारी

– सकाळ वृत्तसेवा

5466728055104411534_Org

Scroll to Top