डेक्कन जिमखाना स्थानकाकडून भिडे पुलाकडे वळताना नेहमीच जे . एम. रोड वरून येणाऱ्या वाहनांची व बस गाड्यांची कोंडी होत असते. ह्या रहदारीच्या रस्त्यावर ट्राफिक पोलीस पण नसतात. ४-४ बस एका मागे एक लागल्या असतात आणि जे. एम . रोड वरून येणाऱ्या गाड्या भिडे पुला कडे जाण्यासाठी खोळंबतात ज्यामुळे संपूर्ण रस्त्यावर रहदारी अडकून राहते. अशा चौकांत सिग्नल असणे अत्यंत गरजेचे आहे. बस डे च्या दिवशी ह्या चौकात स्वयंसेवक तैनात केले असताना ही समस्या जाणवत नव्हती. त्या दिवशी अतिशय सुरळीतपणे एकदा बस गाड्या व एकदा बाकीची वाहने मार्गस्थ होत होती. अशा प्रकारे नेहमीच चोख व्यवस्था ठेवल्यास वाहतुकीचा अडथळा दूर होईल.