काल डेक्कन जिमखाना रस्त्यावर बस डे निमित्याने अनेक आशादायी दृष्य पाहायला मिळाली . ट्राफिक व्यवस्था पाहायला खूप स्वयंसेवक उपस्थित होते. लोक रांगेत बस स्थानकावर उभी होती. भरपूर मार्गदर्शक लोकांना वेळोवेळी बस मार्गा बद्दल माहिती पुरवत होते.
डेक्कन जिमखाना स्थानकाकडून भिडे पुलाकडे वळताना नेहमीच जे . एम. रोड वरून येणाऱ्या वाहनांची व बस गाड्यांची कोंडी होत असते. ह्या रहदारीच्या रस्त्यावर ट्राफिक पोलीस पण नसतात. परन्तु काल बस डे असल्याने तिथे अनेक स्वयंसेवक वाहतूक नियंत्रित करण्यासाठी उभे होते आणि अतिशय सुरळीतपणे एकदा बस गाड्या व एकदा बाकीची वाहने मार्गस्थ होत होती. अशा प्रकारे नेहमीच चोख व्यवस्था ठेवल्यास उत्तम वाहतूक होईल.